Swift New Model 2024 देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आज आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Maruti Swiftची नेक्स्ट जनरेशन मॉडल लाँच केले आहे. कंपनीने आधीपासूनच नवीन स्विफ्टची अधिकृतरित्या बुकिंग सुरू केली आहे. त्यामुळं ज्या ग्राहकांना मारुती स्विफ्ट खरेदी करायची आहे ते कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा डिलरशिपच्या माध्यमातून कार बुक करु शकतात. नवीन मारुती स्विफ्टला पहिल्यांदा जपानमधील मोबिलिटी शोमध्ये सादर करण्यात आली होती.
आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या Maruti Swiftच्या नेक्स्ट जनरेशन मॉडलची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये (एक्स शोरुम) किंमत ठरवण्यात आली आहे. या हॅचबॅक कारमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. कशी आहे नवी स्विफ्ट कार, पाहूयात.
Swift New Model 2024
Swift New Model 2024 नवीन स्विफ्टचे डिझाइन आधीसारखेच आहे मात्र आधीपेक्षा जास्त फिचर्स यात अॅड करण्यात आले आहे. या कारमध्ये नवीन बंपर, नवीन डिझाइनचे रेडिएटर ग्रिल देण्यात आले आहे. त्याचबरोबर ब्रँडचा लोगो पहिले ग्रिलच्या मध्ये होता तो आता कारच्या फ्रंट बोनटवर देण्यात आला आहे. नवीन हेडलँप आणि फॉग-लँपदेखील कारच्या फ्रंटला देण्यात आले आहेत. त्यामुळं संपूर्ण कारला फ्रेश लुक येतोय. नवीन स्विफ्ट आधीपेक्षा थोडी मोठी आहे. ही कार सध्याच्या मॉडलच्या तुलनेत 15 मिमी लांब आणि जवळपास 30 मिमी उंच आहे. मात्र, व्हिलबेस आधीसारखाच 2,450 मिमी आहे. कंपनीने नवीन स्विफ्टमध्ये मागील दरवाजाच्यावर हँडलचा C-पिलरला हटवून याला पारंपारिक पद्धतीने दरवाजावर दिले आहे. त्याचबरोबर नवीन डिझाइनमध्ये अलॉय व्हिल अधिक मजबूत केले आहेत.
केबिन कसं असेल?
कारच्या इंटिरियरला स्मार्ट लूक देण्यात आला आहे. कारचे केबिन काही प्रमाणात Fronxशी मिळते-जुळते आहेत. यात फ्री स्टँडिंग इंफोटेंमेंट सिस्टम, नवी स्टाइलचे सेंटर एयर कॉन वेंट्स देण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त कारच्या आत तुम्हाला नवी अपहोल्स्ट्री आणि नवीन डिझाइनचा डॅशबॉर्डदेखील मिळणार आहे. Swift New Model 2024
नवीन इंजिन आणि जबरदस्त मायलेज
Maruti Swiftमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे कारचे इंजिन. कंपनीने यात पूर्णपणे नवीन 1.2 लीटरची क्षमता असलेले Z सीरीज इंजिन देण्यात येत आहे. या इंजिनमध्ये 82hpची क्षमता आणि 112 Nmचा टॉर्क जनरेट करते. सध्या जे मॉडेल आहेत त्यात K सीरीजचे इंजिन देण्यात आले आहे. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये 25.72 किमी प्रतिलीटर मायलेज देते. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळपास 3 किमी/लीटर जास्त आहे.
फिचर्स
नवीन मारुती स्विफ्टमध्ये कंपनीने 9 इंचाचा टचस्क्रीन इंन्फोटेंमेट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात AC वेंट्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. यातील सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग देण्यात येत आहेत. त्याचबरोबर यात इलेक्ट्रोनिक स्टॅबिलिटी कंट्रोलदेखील देण्यात आला आहे. Swift New Model 2024
नवीन स्विफ्टमध्ये अनेक नवीन फीचर्स
सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशनच्या मारुती सुझुकी स्विफ्टच्या एक्सटिरियर आणि इंटिरियरमध्ये काही खास असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात एलईडी लाइटिंग सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, EBD आणि ब्रेक असिस्टसह सुसज्ज ABS आहे. हिल होल्ड कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटर आणि इतर अनेक स्टँडर्ड आणि सुरक्षा वैशिष्ट्ये पाहिली जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी स्विफ्टची लांबी सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
कारच्या अधिक माहिती साठी | क्लिक करा |
मारुती स्विफ्ट सीएनजी फायनान्स
तुम्ही मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीचा फक्त 1 लाख रुपयांसह डाऊन पेमेंटकरुव फायनान्स करू शकता. स्विफ्टच्या अनेक पेट्रोल व्हेरिएंटसोबत, VXI आणि ZXI ट्रिममध्ये दोन CNG प्रकार देखील आहेत. Swift VXI CNG ची एक्स-शोरूम किंमत 7.85 लाख रुपये आहे आणि Swift ZXI CNG ची एक्स-शोरूम किंमत 8.53 लाख रुपये आहे. जाणून घेऊ या दोन्ही व्हेरिएंटचे लोन, ईएमआय डिटेल्स.
मारुती सुझुकी स्विफ्ट VXI CNG व्हेरिएंट लोन ईएमआय डिटेल्स
मारुती सुझुकी स्विफ्टच्या VXI CNG व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 8,84,231 लाख रुपये आहे. जर तुम्ही या CNG हॅचबॅकचा 9% व्याजदराने 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून फायनान्स केला तर तुम्हाला 7,84,231 रुपये लोन घ्यावे लागेल. लोन फेडण्याचा कालावधी 5 वर्षांचा असेल, आणि मासिक हप्ता 16,279 भरावा लागेल. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, वरील नियम आणि अटींनुसार वित्तपुरवठा करण्यावर किती व्याज आकारले जाईल, तर तुम्हाला 1.93 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील